छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक तिरंगा रॅली ; ज्ञानेश कुमार इस्तीफा दो, इन्कलाब जिंदाबाद च्या दिल्या घोषणा
कणकवली,दि.१३ ऑक्टोंबर
लोकशाहीवादी नागरी संघटना यांच्यावतीने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक तिरंगा रॅली काढण्यात आली. या मोर्चात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आंदोलकांनी केली.यावेळी आंदोलकांनी इन्कलाब जिंदाबाद , एक सट्टा दो चाय, ग्यानू बाबू बाय बाया, ज्ञानेश कुमार इस्तीफा दो … इस्तीफा दो अशा घोषणा देत मोर्चातुन एल्गार देण्यात आला.
मोर्चात आंदोलकांच्या हातात भारतीय राष्ट्रध्वज,घोषणा लिहिलेले फलक घेतले होते. निवडणूक प्रक्रियेत घोळ करुन लोकशाहीचा घात केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या मोर्चात काही तरुणांनी दिल्लीच्या आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगुन निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आवाज उठवला. यावेळी विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोर्चाला संबोधित केले. त्यानंतर कणकवली प्रांताधिकार-यांना ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबाबत निवेदन देण्यात आले.
लोकशाहीवादी नागरी संघटनेच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये माजी आमदार वैभव नाईक, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक , राष्ट्रवादीचे अनंत पिळणकर, कॉंग्रेसचे इर्शाद शेख, नागेश मोरये, बाळू मेस्त्री, राजू राठोड, प्रथमेश सावंत, संकेत नाईक,निलम सावंत, माधवी दळवी, वैदेही गुडेकर, जयेश धुमाळे आणि प्रदीप मांजरेकर, राहुल कदम, बाळू मेस्त्री,जिबिशा सावंत,उत्तम लोके,देवेंद्र पिळणकर,संदीप कदम,आतिश जेठे , प्रथमेश सावंत, मेघल डिसोजा, तेजस राणे,बबली राणे,प्रा.राजेंद्र मुंबरकर ,ॲड.मनोज रावराणे,डॉ. मिलींद म्हसकर, प्रवीण वरुणकर,प्रदीपकुमार जाधव,महेश तेली, नितीन वाळके, हर्षद गावडे , तात्या निकम , सचिन लोके यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.