कणकवलीत भाजप महिला आघाडीच्या वतीने केला निषेध
कणकवली ,दि.१३ जुलै
ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार व त्यांचा पुत्र गितेश राऊत यांच्यासह राऊत कुटुंबीयांना गिरिजा राऊत हिचा मानसिक व शारीरिक छळ केला. त्यांचे हे कृत्य घृणास्पद व लांचनास्पद आहे. त्यांच्या कृत्यांचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चावतीने आम्ही निषेध करतो. माजी खा. विनायक राऊत हे स्वत:च्या सुनेला न्याय देऊ शकत नाही, ते उबाठा पक्षातील महिलांना काय न्याय देणार? गिरिजा राऊत हिच्यावर झालेल्या अन्यायविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह््यातील भाजप पक्षातील माहिला पाठिशी आहेत. स्वत:च्या सुनेचा शारीरिक व मानसिक छळ करणाºया विनायक राऊत यांच्या असलेल्या पदांचा राजीनामा घेण्यासाठी उबाठा पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाकडे मागणी करावी. राऊतांच्या कृत्याविरोधात मविआतील महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करून गिरिजा राऊत हिला न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविका मेघा गांगण यांनी केले.
खा. नारायण राणे संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती गांगण बोलत होत्या. यावेळी सभापती हर्षदा वाळके, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण, जि. प. सदस्या सुप्रिया मेस्त्री, शीतल दळवी, नगरसेविका मेघा गांगण, आर्या राणे आदी उपस्थित होते.
ठाकरे शिवेसेचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर कुटुंबावर त्यांच्या सुनेने अत्यंत गंभीर आरोप आणि खळबळजनक आरोप केले आहेत. विनायक राऊत यांचे पुत्र तथा मुंबई मनपा नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह कुटुंबीयांनी गिरिजा राऊता हिचा मानसिक व शारीरिक छळ केला आहे. छळाविरोधात गिरिजा हिने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार राऊत पिता-पुत्रासह सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गिरिजा राऊत यांनी राऊत कुटुंबीयांवर केलेले आरोप गंभीर आहेत. सासरच्या लोकांकडून गोमुत्र पाजणे, केस कापणे यांसारखे अघोरी प्रकार करण्यात आल्याचा आरोप गिरिजा यांनी केला आहे. विनायक राऊत हे माजी खासदार असल्याने त्यांचे विविध राजकीय कार्यक्रम असायचे. या कार्यक्रमांना अडचण नको म्हणून सासू यांनी मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेण्यासाठी जबरदस्ती करायचे. ज्यामुळे त्यांना आरोग्याचा मोठा त्रास सहन करावा लागला, त्यामुळे गिरिजा न्याय मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्गातील महिला तिच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. खा. राऊत यांच्या अनधिकृत धंद्यांचे पैसे सुनेच्या खात्यावर जमा होत होते. त्यांच्या खात्यावर पैसे राऊत पिता-पुत्र काढायचे, असा आरोप गांगण यांनी केला.
राऊत पिता-पुत्रांनी गिरिजा राऊत हिचा मानसिक व शारीरिक छळ केला. त्यांचे हे कृत्य माणुसकीची काळीमा फासरणारी आहे. त्यामुळे आम्ही महिला त्यांच्या कृत्याचा जाहीरपणे निषेध करीत आहोत, असे हर्षदा वाळके यांनी सांगितले.