कणकवली : गणेश चतुर्थीपूर्वी बोर्डवे बौद्धवाडी-वाणीवाडी रस्त्याची डागडुजी करा

शेअर करा

ठाकरे शिवसेनाच्यावतीने गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी..

कणकवली,दि.०६ सप्टेंबर

बोर्डवे गावातील बौद्धवाडी ते वाणीवाडी हा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असून, त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर तरी या रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात कच्ची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनाच्यावतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना निवेदन देऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य महादेव राठवड, कळसुली विभाग प्रमुख बबली राणे, ग्रामस्थ निलेश परब यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावात दाखल होणार आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता, गणेश चतुर्थीपूर्वी या मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करून वाहतुकीस योग्य करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

संबंधित अधिकाऱ्यांनी गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्याची डागडुजी करून देण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी ग्रामस्थांना दिले. मात्र, दिलेल्या आश्वासनानुसार रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थ व चाकरमानी यांच्या वतीने उपोषण व आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

शेअर करा