नारायण राणेंच्या दूरदृष्टीच्या निर्णयांचा वारसा पुढे नेत आहोत ; निलेश राणे तळमळीने आणि जनहिताची भूमिका मांडतात
कणकवली,दि.०३ ऑगस्ट
सभागृहात आमदार निलेश राणे बोलताना महसूल विभागाशी संबंधित विषय अत्यंत अभ्यासपूर्ण, तळमळीने आणि जनहिताची भूमिका मांडत आहेत. त्यांनी सिंधुदुर्गच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांनी मांडलेल्या महसूल विभागाच्या सर्व विषयांवर निर्णय घेण्याचे मी वचन देतो, गेल्या अनेक वर्षांपासून आकारीपड , वनसंज्ञा, कबुलातदार गावकर , ईको सेन्सिटिव्ह , चिरे – वाळू रॉयल्टी या विषयावर लवकरच निर्णय घेतला जाईल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा माजी महसूल मंत्री नारायण राणे यांच्या कार्याचाही गौरव करत, महसूल मंत्री म्हणून नारायण राणे यांनी घेतलेल्या अनेक दूरदृष्टीच्या निर्णयांचा पाया आजही भक्कम आहे. त्या निर्णयांना पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. कोकण दौऱ्यावर येण्यापूर्वी मी त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांच्याशी मी फोनवर चर्चा केली.