पालकमंत्री नितेश राणेंकडून पाहणी ;रुंदीकरणाबाबत अधिकाऱ्यांना सूचना
कणकवली,दि.१२ सप्टेंबर
कनेडी बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नावर नागरिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले. त्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी संदेश सावंत आणि अधिकाऱ्यांसोबत कनेडी बाजारपेठेची प्रत्यक्ष पाहणी करत रस्ता रुंदीकरणाबाबत चर्चा केली. प्रस्तावित रस्ता रुंदीकरणामुळे निर्माण होणाऱ्या विविध बाबी, स्थानिक परिस्थिती तसेच नागरिकांच्या अडचणींची प्रत्यक्ष माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली. रस्ता रुंदीकरण कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य नियोजन व आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्यामुळे कनेडी बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी लागणार आहे.
भाजपा विभागीय कार्यालयात येथे भेट देत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरूवारी विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी नागरिकांच्या विविध प्रश्नांवर संवाद साधला. यावेळी नाटळ जि. प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी जि.प.अध्यक्षा , संजना सावंत, सुरेश ढवण, नाटळ सरपंच सुनील घाडीगांवकर, सांगवे , संजय सावंत, दारिस्ते सरपंच सानिका घाडीगांवकर , दिगवळे सरपंच संतोष घाडीगांवकप, गांधीनगर सरपंत – मंगेश बोभाडे , उफसरपंच प्रफुल्ल काणेकर, संतोष सावंत , श्रीकांत सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांनी विभागातील विकासकामे व नागरिकांच्या विविध समस्यांबाबत संदेश सावंत यांच्यासोबत चर्चा केली. पंचक्रोशीतील विविध गावांमधील नागरिक, मतदार, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राणे यांची भेट घेऊन आपल्या विविध समस्या व मागण्यांची निवेदने दिली. काही तातडीच्या प्रश्नांवर त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून समस्या मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे नागरिकांच्या अनेक प्रश्नांना प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ गती मिळणार आहे.