कणकवली रोटरी क्लबच्या माध्यमातून केले जाईल नवनवीन संकल्प – सुप्रिया नलावडे

शेअर करा

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल पदभार समारंभ

कणकवली,दि.१३ जुलै
कणकवली रोटरी क्लब च्या माध्यमातून दुर्लक्षित उपेक्षित घटकांना सहाय्यक खऱ्या अर्थाने समाजातील दरी दूर करण्याचे काम कणकवली रोटरी क्लबच्या माध्यमातून केले जाईल नवनवीन संकल्प राबविले जातात असतानाच एक भरीव काम करण्यावर पुढील वर्षभरात माझा भर असेल आणि याकरिता सर्व रोटरीच्या सदस्य व पदाधिकारी यांची साथ घेऊन कणकवली होते म्हणून एक उल्लेखनीय कामगिरी करेल असा विश्वास कणकवली रोटरी क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सुप्रिया समीर नलावडे यांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल पदभार समारंभ मोठ्या दिमाखात अलंकार हॉल जाणवली येथे पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात कु. अबीर मराठे यांच्या गणेश स्तवन आणि कौशल्येचा राम या गीताने झाली. नव्याने रोटरी क्लब कणकवलीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
त्यामध्ये नुतन अध्यक्ष नगरसेविका सुप्रिया नलावडे यांची निवड करण्यात आली. तसेच सेक्रेटरी डॉ. अमेय मराठे, ट्रेझरर डॉ. प्राजक्ता नाचणे, उपाध्यक्ष तृप्ती कांबळे, सार्जन एट आर्म स्नेहलता राणे, क्लब सर्विस डायरेक्टर मेघा गांगण, व्होकेशनल सर्विस मोहिनी राठोड, कम्युटी सर्विस डायरेक्टर रवी परब इंटरनॅशनल सर्व्हिस डायरेक्टर नितीन बांदेकर, युथ सर्विस डायरेक्टर डॉ. धनंजय रासम, फॅमिली फेलोशिप डायरेक्टर महेंद्र मुरकर, क्लब लर्निंग फॅसिलिटेरर प्रमोद लिमये, एडिटर अनिल कर्पे तसेच रमेश मालविया,जीवन रेगे, दीपक अंधारी, दीपक बेलवलकर, समीर नलावडे, वर्षा बांदेकर, सोनू मालविया, संतोष कांबळे, स्मिता पावसकर, डॉ. विद्यालय ताईशेटे, आनंद पोरे, लीना काळसेकर, जगदीश राणे, प्रिती पावसकर सुहास पावसकर,हेमा तायशेटे, लवू पिळणकर राजश्री रावराणे, संध्या पोरे, सोम गांगण, वीरेंद्र नाचणे, दिशा अंधारी, भेराराम राठोड, उमा परब, माधवी मुरकर, अंकिता कर्पे, राजेश कदम, डॉ. अश्विनी नवरे डॉ. स्वप्रिल राणे यांना देखील पदभार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वाई येथील पी. डी. जी. स्वाती हेरकर या लाभल्या होत्या. त्यांनी आपले अध्यक्षीय भाषणात विविध प्रोजेक्ट रोटरीच्या माध्यमातून कशा पद्धतीने राबवता येतील , याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मावळते अध्यक्ष अॅड. राजेंद्र रावराणे यांनी गेल्या वर्षी रोटरीच्या माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा दिला. आर.डी. सी. मीट आणि आयडियल स्टडी अॅप चे मोफत वाटप आणि करिअर मार्गदर्शन उपक्रम, ज्येष्ठ नागरिक दिन, स्वच्छता मोहीम यासारखे अनेक उपक्रम राजेंद्र रावराणे यांच्या कालखंडात राबविण्यात आल्याचे सांगितले.
नुतन अध्यक्ष सुप्रिया नलावडे म्हणाल्या, रोटरी कल्ब मध्ये काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन सर्वांसाठी सेवा हे ध्येय वाक्य केंद्रस्थानी असेल. क्लब मधील प्रत्येक सदस्य हा आपल्या कुटुंबाचा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकामध्ये असलेल्या कौशल्यांचा आणि अनुभवाचा योग्य उपयोग करून आपण अधिक परिणामकारक सेवा प्रकल्प राबवले जातील.
यावेळी कृषी क्षेत्रात योगदान देणारे संदीप राणे यांना रोटरीची फोर वे टेस्ट देऊन सन्मानित करण्यात आले.
हॉटेल व्यावसायिक दत्ता शंकरदास आणि महेश शंकरदास यांना रोटरीचा बिझनेस एक्सप्रेस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून कणकवली शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी पार पाडत असलेल्या प्रकाश राठोड, विनोद कांबळे, समीर मोरे यांना रोटरीचा व्होकेशनल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजय भोगले गुरुजी यांना कै. रवींद्रनाथ मुसळे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्यात आला. मूकबधिर असून देखील उत्कृष्ट चित्रकार असलेले स्वप्रिल पांडुरंग पाटणकर यांना देखील रोटरीचा व्होकेशनल अवॉर्ड देण्यात आला.

यानंतर रोटरी परिवारातील मुले ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले आहे असे अबिर मराठे, शौर्य नाचणे, आर्या तायशेटे, नित्यानंद मुरकर, अभिषेक राणे, स्वराली कदम, निर्झरा बांदेकर यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी असिस्टंट गव्हर्नर संजय रावराणे, अभिषेक माने, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली, राजेश घाटवळ, डॉ. विद्याधर तायशेटे, एरिया हेड नीता गोवेकर आणि देवगड, खारेपाटण, वैभववाडी, मालवण, कुडाळ, ओरस सावंतवाडी, वेंगुर्ला, शिरोड आणि बांदा येथून रोटरीचे पदाधिकारी उपस्थित राहिले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम, स्नेहलता राणे, मेघा गांगण यांनी काम पाहिले. सेक्रेटरी डॉ. अमेय मराठे यांनी आभार मानले.

शेअर करा