कणकवली महिला व्यापारी संघटना अध्यक्षपदी संजना काकडे

शेअर करा

महिला व्यापारी संघटनेची कार्यकारणी जाहीर : सचिवपदी ऋतुजा कोरडे, खजिनदारपदी निलिमा सावंत-भोगले यांची निवड

कणकवली,दि.११ जुलै

कणकवली येथील महिला उद्योजिका व व्यावसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महिला व्यापारी संघटना, कणकवलीच्या सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार नुतन महिला व्यापारी संघटना अध्यक्षपदी संजना काकडे यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी तन्वी पारकर, सचिवपदी ऋतुजा कोरडे, सहसचिवपदी दिशा काणेकर, खजिनदारपदी निलिमा सावंत-भोगले, सहखजिनदारपदी स्मिता उचले-गोवेकर यांची निवड झाली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून साक्षी सादये, सुप्रिया पाटील, किशोर धुपकर, तृप्ती टकले, समिक्षा पेडणेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.संघटनेच्या सल्लागार समितीमध्ये लिना काळशेकर, अमिता कुलकर्णी, मेधा शेट्टी, ईशा खाडये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नुतन पदाधिकाºयांचे अभिनंदन करण्यात आले. व्यापारी संघाचे अध्यक्ष दिपक बेलवलकर, उपाध्यक्ष राजु पारकर, विलास कोरगावकर, संतोष काकडे, अशोक करंबळेकर, राजा राजाध्यक्ष, श्री. गणपत्ये आदींसह ४० ते ५० महिला व्यापारी या बैठकीला उपस्थित होते.

शेअर करा