राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समिती शिष्टमंडळाशी कणकवली येथे यशस्वी चर्चा, पालकमंत्री नितेश राणे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे आंदोलन स्थगित
कणकवली,दि.०५ जुलै
देवगड येथील बीएलओ प्रशिक्षणवेळी कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे या घटनेच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील 26 कर्मचारी संघटना एकत्र येत राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्गच्या नेतृत्वाखाली कणकवली येथे झालेल्या आंदोलन पार्श्वभूमीवर कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे व समन्वय समिती शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाली. कर्मचा-यांचा अपमान करणा-या अधिका-याना सिंधुदुर्ग जिल्हयात थारा नाही , हा माझा शब्द आहे asgi
यावेळी समन्वय समिती अध्यक्ष राजन कोरगावकर,राज्यनेते सखाराम सकपाळ,सचिव सत्यवान माळवे,नरसू रेडकर,वामन तर्फे,दिनेश म्हाडगुत,सुहास सावंत,संदिप कदम ,राजू वजराटकर,जगदीश गोगटे,जयेंद्र चव्हाण,सचिन मदने,संदिप मिराशी,निकिता ठाकूर,सोमनाथ शेंगाळ,लक्ष्मण वळवी,सुशांत मर्गज,निलेश ठाकूर,टोनी म्हापसेकर,हनुमंत वाळके,सुभाष गावकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भविष्यात सिंधुदुर्गातील कोणत्याही अधिका-याकडून कोणाही कर्मचारीबाबतीत अशी घटना घडल्यास कर्मचारी समन्वय समितीने थेट माझ्याशी संपर्क साधावा. मला सिंधुदुर्ग जिल्हयातील कोणत्याही अधिका-यापेक्षा कर्मचारी महत्वाचे आहेत.
या प्रकरणात आपण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची बदली करण्याची ग्वाही दिली आहे.त्यामुळे सर्व कर्मचारी बांधवांनी बीएलओ व एसआयआरचे काम मुदतीत पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य करावे ,yavar कर्मचारी समन्वय समिती शिष्टमंडळाची पालमंत्री नितेश राणे यांचेशी समाधानकारक चर्चा झाली. Tyaamile आंदोलन स्थगित करण्यात येत असून यापुढे सर्व कर्मचारी यांनी बीएल ओ व SIR हे राष्ट्रिय काम असल्याने हे काम करण्याचे शिष्टमंडळाने मान्य केले आहे.
या प्रकरणात कोणाही अधिकारीने कर्मचा-यांचा अवमान केल्यास सिंधुदुर्ग जिल्यातील कर्मचारी संघटनाची एकजूट पहावयास मिळाली व या एकजुटीचा विजय आहे .सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष आभार समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी मानले.या प्रकरणात सकारात्मक लक्ष देवून समन्वय समितीशी संपर्क साधणारे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचेही आभार मानले.सर्व पत्रकार व इलेक्ट्राॅनिक मिडिया ,राज्यभरातील सर्व संघटना प्रतिनिधी यांचेही आभार व्यक्त केले.समन्वय समितीत सहभागी 26 कर्मचारी संघटना व आंदोलनात सहभागी झालेले कर्मचारी यांचेही आभार मानले.