कणकवली ,दि.२२ ऑगस्ट
कणकवली : ‘महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान’अंतर्गत कणकवली नगरपंचायत क्षेत्रातील गांगोमंदिर येथे सोलर हायमास्ट उभारण्यात आला आहे. या सोलर हायमास्टचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी नगरसेविका आर्या राणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
यावेळी नगरसेविका आर्या राणे, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर ,औदुंबर राणे , डॉ. संदीप नाटेकर,नगरसेवक राकेश राणे,परेश परब,माजी नगरसेवक अभय राणे ,महेश सावंत, नवनीत बागवे,ओंकार चव्हाण, रेखा गावडे ,प्राजक्ता राणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.