कणकवलीत पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून नाग्या म्हादू निवासी वस्तीगृहाला सोलर पॅनल व दिविजा वृध्दाश्रमाला वॉशिंग मशीनची भेट
कणकवली,दि.२० सप्टेंबर
देशभरात सेवा सप्ताह कार्यक्रमानिमित्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सेवाभावी उपक्रम राबवित आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आज वाढदिवस होत आहे. एक कार्यकर्ता ते भाजपा प्रदेशाध्यक्ष अशी रवींद्र चव्हाण यांची वाटचाल आहे, ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. राजकारणात असले तरी स्वत: ते लोकांची सेवा करण्याचे काम करीत आहेत. समाजातील विविध घटकांना ताकद देण्याचे त्यांच्या व्यक्तीमत्वाचा गुण आहे. भाजपा सिंधुदुर्गच्यावतीने आदीवासी वस्तीगृहासाठी सोलर पॅनल व लाईट सिस्टीम ,दिविजा वृध्दाश्रमासाठी वॉशिंग मशीनची भेट देत आहोत. आदीवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सोलर पॅनल उपयोगी पडेल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
कणकवली येथील खा. नारायण राणे संपर्क कार्यालय येथे पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून भाजपा सिंधुदुर्गच्यावतीने नाग्या म्हादू वस्तीगृहाला सोलर पॅनल व लाईट सिस्टीम उदय आईर यांना तर असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाला वॉशिंग मशीनची भेट पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी आ. अजित गोगटे, सभापती हर्षदा वाळके, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलींद मेस्त्री , बॅंक संचालक विठ्ठल देसाई, जि.प.सदस्य मनोज रावराणे, जि.प.सदस्या सुप्रिया मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, संदीप सावंत, सहदेव खाडये , नगरसेवक बंडू हर्णे, नगरसेविका मेघा गांगण, राजू हिर्लेकर, मंगेश लोके , सरपंच चंद्रकांत डामरे, आनंद ठाकूर, सुभाष मालंडकर, विजय चिंदरकर, संतोष किंजवडेकर, संतोष डामरे, औंदुंबर राणे, महेश सावंत, माजी नगरसेवक किशोर राणे, संतोष पुजारे, सागर राणे सर्वेश दळवी, अभय गांवकर, अमोल रासम, छत्रुघ्न डामरे आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी उदय आईर म्हणाले, नाग्या म्हादू निवासी वस्तीगृहाला पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य झालेले आहे. प्रशासकीय पातळीवर सहकार्य करण्याचे काम केलं आहे. कातकरी समाजातील मुलांना प्रवाहात आणण्यासाठी आम्ही काम करीत असताना मदत करण्याची भूमिका त्यांची आहे.
संदेश शेटये म्हणाले, दिविजा वृध्दाश्रमाला असलेली गरज लक्षात घेवून पालकमंत्री नितेश राणे यांनी वॉशिंग मशीनची भेट दिली , त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो.