कणकवली : स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त स्पोर्ट टिशर्ट व स्पोर्ट पॅन्टचे वाटप

शेअर करा

जिल्हा राष्ट्रवादी क़ॅाग्रेसच्यावतीने उपक्रम ; कणकवली प्राथमिक शाळा नं.5 मध्ये उपक्रम

कणकवली,दि.२३ जुलै

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने शहरातील शाळा नं ५ मध्ये विद्यार्थ्यांना स्पोर्ट टिशर्ट व स्पोर्ट पॅन्टचे वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडी वर्गखोलीसाठी शैक्षणिक उपक्रमाचे माहिती देणारे भित्तीपत्रकही देण्यात आले.

येथील शाळा नं ५ मध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. हुमेरा अबिद नाईक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, शहराध्यक्ष इम्रान शेख, उपाध्यक्ष सचिन अडुळकर, मुख्याध्यापिका कल्पना मलये, उज्वला जावडेकर, केतकी दळवी, अंगणवाडी सेविका स्वाती पोयेकर व पालकवर्ग उपस्थित होते. स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर राष्ट्रवादीतर्फे जनसेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. यात महिला, युवा वर्गासाठीच्या कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबिरांसारखा उपक्रम या सप्ताहात आयोजित करण्यात आलेले आहेत.

याच उपक्रमांतर्गत येथील शाळा नं ५ मध्ये हा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी ५५ मुलांन स्पोर्ट टिशर्ट व पैंट देण्यात आली. तसेच शाळा व अंगणवाडीमधील मुलांना खाऊ वाटपही करण्यात आले. अंगणवाडी इमारतीच्या भिंती बोलक्या असाव्यात विद्यार्थ्यांना या माध्यमातून हसत खेळत शिकविता यावे, यासाठी भित्तीपत्रकेही भिंतींना चिकटवून देण्यात आली. यावेळी अॅड समृद्धी जैतापकर यांनी एलएलएम पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार अबिद नाईक यांच्याहस्ते करण्यात आला.

स्व. अजितदादांचा वाढदिवस गेली अनेक वर्षे आपण साजरा करत होतो. परंतु आज जयंती साजरी करताना मनाला खूप वेदना होत आहेत. अजितदादांनी क्रिडा साहित्य, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात भरीव योगदान दिलेले आहे त्यांनी राज्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठीच कायम प्रयत्न केले सत्तेच्या माध्यमातून त्यांनी जनसेवा हा निर्धार केला होता म्हणूनच ‘कामाचा माणूस’ असा त्यांचा उल्लेख केला जात असे त्यांनी जनसेवेचे सुरू केलेले हे व्रत असेच अखंडपणे चालू ठेवण्यासाठीच जनसेवा सप्ताह साजरा करण्यात येत असल्याचे अबिद नाईक यांनी सांगितले.

शेअर करा