कणकवली : नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली अखेर स्ट्रीट लाईटचे काम घेतले हाती

शेअर करा

नांदगाव व असलदे ग्रामस्थांच्या मागणीला यश; क्रेंनच्या सहाय्याने सुरु करण्यात आले काम..

कणकवली,दि.१४ जून

नांदगाव व असलदे ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांकडे मांडलेल्या विविध समस्यांची दखल घेत अखेर महामार्ग प्राधिकरणाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. नांदगाव तिठा येथील उड्डाणपुलाखालील दोन्ही पॅसेजमध्ये अंधाराचे साम्राज्य असल्याने नागरिक, वाहनचालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.याबाबत ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांची लक्ष वेधल्यानंतर उड्डाणपुलाखाली तातडीने स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम रविवारी हाती क्रेनच्या मदतीने हाती घेण्यात आले आहे.

ग्रामस्थांच्या मागणीनंतर रविवारी महामार्ग प्राधिकरणाकडून स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यासाठी हालचाल करण्यात आली. नांदगाव ग्रामपंचायत मार्फत चार हॅलोजन देण्यात आले आहेत. त्यामुळे आता नांदगाव उड्डाणपुलाखालील दोन्ही पॅसेजमध्ये उजेड होणार असून रात्रीच्या वेळी महिलांना ,कॉलेज मधील मुलींना,नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीपासून दिलासा मिळणार आहे.या कामामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

शेअर करा