नागरिकांची गैरसोय ; नगरपंचायत ने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
कणकवली,दि.०१ जुलै
कणकवली शहरातील भूमिअभिलेख कार्यालय ते तायशेटे हॉस्पिटल या मार्गावरील स्ट्रीट लाईट्स काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालक, पादचारी तसेच रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या संबंधित यंत्रणेने या बिघाडाची तातडीने दखल घेऊन बंद असलेले स्ट्रीट लाईट्स सुरू करावेत, अशी मागणी केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंधारामुळे अपघाताची शक्यता आहे.