कणकवली : विद्यार्थी दशेत मुलांनी धाडस करुन प्रगती साधत नावलौकीक मिळवले पाहिजे – नागेश मोरये

शेअर करा

सरस्वती हायस्कूल नांदगाव याच्या संयुक्त विद्यमाने गुणवंतांचा सत्कार सोहळा…

कणकवली , दि. १९ जून

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम गेली ४१ वर्ष सातत्याने करत असून या कार्यक्रमासाठी आजवर अनेक वरीष्ठ अधिका-यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप दिली.यातून अनेक विद्यार्थी घडले असून यापुढेही घडतील यासाठी हा उपक्रम सातत्याने राबवत आहे.याचबरोबर विद्यार्थी दशेत मुलांनी धाडस करुन प्रगती साधत नावलौकीक मिळवले पाहिजे,असे श्रीदेव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगावचे अध्यक्ष तथा माजी जि.प. सभापती नागेश मोरये सांगितले.

ते श्रीदेव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ, नांदगाव,नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था,नांदगाव व सरस्वती हायस्कूल नांदगाव याच्या संयुक्त विद्यमाने गुणवंतांचा सत्कार सोहळयात नांदगाव हायस्कूलच्या सभागृहात बोलत होते.

कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन व सरस्वती मूर्तीला पुष्पहार अध्यक्ष नागेश मोरये याच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष दयानंद लोके,सचिव कृष्णा म्हसकर,नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष गजानन रेवडेकर, उपाध्यक्ष संजीव शिरसाट, संचालक श्रीधर मोरये, पालक संघाचे उपाध्यक्ष मारूती मोरये, विशाल मोरये,प्र. मुख्या. शर्वरी सावंत-राणे, शिक्षक सौ श्रावणी मोरये, श्रीम. कविता नलावडे, श्री उपेंद्र पाटकर, श्री रघुनाथ कारेकर, श्री राजेश नारकर, श्री हरिदास खरोडे, श्री श्रीकांत सावंत,विलास तांबे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मोरये म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी आपण या माध्यमातून अनेक उपक्रम माझे सहकारी,शिक्षक व ग्रामस्थांच्या सहकार्याने राबवले. पूर्वी बोर्डात आलेले व आता शंभर टक्के मिळालेल्याचे सत्कार होत आहेत. केले.आज विद्यार्थी मोबाईलच्या विळख्यात अडकत चालला आहे. याचा परिणाम शिक्षणा बरोबर व्यवसायावर होत आहे.मुलांनी मैदानी खेळ करुन आपली शारिरीक प्रगती साधली पाहीजे. यासाठी मेहनत घेऊन मोठे अधिकारी बना त्याचबरोबर व्यावसायिक बना असे मार्गदर्शन केले. तरी गजानन रेवडेकर यांनी नागेश मोरये याच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम गेली ४१ वर्षे होत आहे. शाळेतील शिक्षक अहोरात्र परिश्रम घेतात म्हणूनच शंभर टक्के निकाल लागत आहेत.आमचाही विद्यार्थी जिल्ह्यातून पहिला आले पाहीजे. सत्कारमूर्तीना जी झाडे दिली जातात त्याचे वृक्षारोपण केले पहीजे हाही एक आमच्या उपक्रमाचा भाग आहे. असे सांगत शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनधून सान्वी कारेकर,राज्ञी कुळकर्णी व पालक सामंत यानी मनोगत व्यक्त केले.

तत्पूर्वी ईशस्तवण व स्वागत गीत होत माध्यमिक शालांत परीक्षेत १००टक्के गुण मिळालेल्या कु.सान्वी रघुनाथ कारेकर (विद्यामंदीर हायस्कूल कणकवली), राज्ञी विवेक कुळकर्णी(शेठ म.ग.देवगड),कु.भार्गवी अकुंश शेटवे (मिलाग्रीस सावंतवाडी),कु.दिया निलेश सामंत(पाट हायस्कुल),कु. शुधांशू महेश धुरी(कुडाळ हायस्कूल),कु. कृष्णा महेश पास्ते (मिलाग्रीस सावंतवाडी) व नांदगाव हायस्कूल मधील कु. अदिती अजय चाळके,कु. मृणाली मारूती मोरये,कु.अदिती अवधूत वाळके याच्यासह प्र.मुख्या. शर्वरी सावंत याचा कल्पवृक्ष,श्रीफळ,शाल व सन्माचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच तसेच आम. प्रमोद जठार,उद्योजक विवेक माणगांवकर याचे शुभेच्छा पत्र वाचन करण्यात आले.यावेळेस श्री.माणगांवकर यानी शाळेस देणगी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री संजय सावंत यानी मानले.

शेअर करा