कणकवली : लोरे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुनील रावराणे यांची बिनविरोध निवड

शेअर करा

कणकवली,दि. १६ ऑगस्ट

लोरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या रिक्त असलेल्या चेअरमन पदाची निवडणूक रविवार १६ ऑगस्ट रोजी सोसायटीच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग येथील अध्यासी अधिकारी अमोल बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत सुनील मधुकर रावराणे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडीनंतर कृषि उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग सभापती तुळशीदास रावराणे नवनिर्वाचित चेअरमन सुनील रावराणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या हितासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे, तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन वेळोवेळी केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सोसायटीच्या माध्यमातून सभासदांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेचा कारभार अधिक सक्षम करण्याची अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. सुनील रावराणे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, सुमन गुरव, नरेश गुरव, सरपंच अजय रावराणे, विठ्ठल मांडवकर, गुरुनाथ रावराणे, सीताबाई जाधव, हरिश्चंद्र मोसमकर, रघुनाथ रावराणे, मारुती रावराणे, प्रकाश रावराणे, विलास रावराणे, अनंत रावराणे, उत्तम रावराणे, रेश्मा रावराणे, सचिन सावंत आदी उपस्थित होते

शेअर करा