कणकवली, दि. ०७ जुलै
तालुक्यातील सेंट उर्सुला स्कूल, वरवडे येथील इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी कु. स्वरा विजय मलगुंडे हिने रायटिंग विझार्ड्स हस्ताक्षर ऑलिम्पियाड २०२५-२०२६ या राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात ९ वा क्रमांक पटकावून शाळा व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
स्वराने सुंदर हस्ताक्षर, सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या बळावर हे उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशासाठी सेंट उर्सुला स्कूल, वरवडे येथील मुख्याध्यापिका, अध्यापक वर्ग तसेच पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्वराच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी ठरली आहे.
कु. स्वरा विजय मलगुंडे हिचे शाळा व्यवस्थापन, अध्यापक वर्ग, पालक व परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.