कणकवली : नागवे सांगवेकरवाडी येथील सार्वजनिक विहीर कोसळली

शेअर करा

कणकवली ,दि.३१ मे

तालुक्यातील नागवे सांगवेकरवाडी येथील सार्वजनिक विहीर कोसळली असून यामुळे या वाडीतील नागरिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच या विहिरीमध्ये अनेक लोकांनी विद्युत पंप टाकून घरापर्यंत थेट पाणी नेले होते. विहीर कोसळल्यामुळे हे सर्व पंप विहिरीमध्ये गाडले गेले आहेत. त्यामुळे याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. तसेच ही विहीर जीर्ण झाल्याबाबत प्रशासनाकडे उपसरपंच महेंद्र कुडाळकर यांनी पाठपुरावा केला होता. नागवे मध्ये जलजीवन मिशन योजनेचे काम दोन वर्ष रखडले असल्याने या विहिरीच्या पाण्यावर या वाडीतील लोक अवलंबून होते. मात्र विहीर कोसळल्यामुळे या लोकांना आता पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेअर करा