कणकवली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करंजे नं. १ शाळेत वृक्षारोपण

शेअर करा

​​​कणकवली,दि.०५ जुन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करंजे नं. १ येथील शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वाढते तापमान, पर्यावरणातील बदल आणि निसर्ग संवर्धनाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे महत्त्व विषद करताना पृथ्वीवरील तापमान वाढत असताना वृक्ष हे मानवासाठी प्राणसंजीवनी असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात किमान दहा झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले. “एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू; मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाखू” हा संदेश देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहल गोसावी, माजी उपसरपंच श्री. चिंदरकर, ग्रामसेवक श्री. ऋतुराज कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ श्री. विजय परब, कृषी पर्यवेक्षक श्री. तायडे, आरोग्य विभागाच्या सीएचओ श्रीमती रासम मॅडम, अंगणवाडी सेविका सौ. शिरसाट, सौ. नारकर, सौ. मळये, ग्रामपंचायत सदस्या सौ. सातवसे, आशा सेविका सौ. शुभांगी मेस्त्री, श्री. उत्तम वावळीये, श्री. रमेश घोणे तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या शेवटी लावण्यात आलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शेअर करा