कणकवली,दि.०५ सप्टेंबर
कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुखपदी विजय इंगळे याची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकानाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरसाईक व युवासेना कोअर कमिटी सदस्य तथा कोकण विभाग युवासेना सचिव विकास गोगावले यांच्या सुचनेनुसार विजय इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाकडून श्री.इंगळे याना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. यात हिंदूहृदयसम्राट तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आमदार निलेश राणे यांचे विजय इंगळे हे कट्टर समर्थक असून शिवसेनेने श्री. इंगळे याच्यावर कणकवली विधानसभा मतदार संघाच्या युवासेना जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल त्याचे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक या सर्वांनी अभिनंदन केले.
