मुंबई महापालिकेचे भाजप नगरसेवक कमलाकर दळवी यांची ग्वाही; अमर सेवा मंडळातर्फे सत्कार
कणकवली,दि.१७ सप्टेंबर
फायनल गावच्या विकासासाठी सामूहिकरीत्या प्रयत्न करून गावाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. गावातील ज्या काही समस्या असतील त्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही मुंबई महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक तथा आयनलचे सुपुत्र कमलाकर दळवी यांनी दिली.
आयनल येथील अमर सेवा मंडळाच्या वतीने कमलाकर दळवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.यावेळी अमर सेवा मंडळाचे अध्यक्ष भगवान मसुरकर, माजी सरपंच मनोहर चव्हाण तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दळवी म्हणाले, गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आयनल गावातील विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले जातील. गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी भाजपच्या माध्यमातून आवश्यक तो पाठपुरावा करून विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करु,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन साईनाथ ओटवकर यांनी केले.