पारंपरिक खेळांनी रंगली मैफल ;मिळून साऱ्याजणी महिला मंच, कणकवलीचा उपक्रम
कणकवली ,दि.२२ ऑगस्ट
‘मिळून साऱ्याजणी महिला मंच, कणकवली’ यांच्या वतीने आयोजित ‘श्रावणसरी’ कार्यक्रम शिवशक्ती हॉल, कणकवली येथे महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रसिद्ध महिला दशावतार कलाकार , मालवणी नटसम्राज्ञी अक्षता कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिलांनी पारंपरिक फुगड्यांचा फेर धरत श्रावणातील सांस्कृतिक परंपरेला उजाळा दिला. फुगड्यांचे विविध प्रकार, पारंपरिक खेळ तसेच उखाण्यांनी कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. फुगडी आणि आधुनिक व्यायाम यांचा संबंध स्पष्ट करताना महिला समुपदेशन केंद्राच्या रोमा खडपकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. पारंपरिक फुगड्यांमधून मनोरंजनासोबतच शारीरिक व्यायामही होतो, याबाबत त्यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाला भाग्यश्री रासम, रोहिणी पिळणकर, नीता मयेकर, अंजू घवाळी, सुखदा गांधी, अमिता सावंत, श्वेता घाणेकर, संजना साटम, रीमा साटम, सुमेधा काणेकर, श्वेता उचले, सुप्रिया सरंगले, सुविधा राणे, जिजाबाई मेस्त्री, गौरी पिळणकर, शितल चव्हाण, दिव्या साळगावकर, प्राची गायकवाड, वैशाली केळुसकर, समीक्षा गुरव, मीनल चव्हाण, गीता पिळणकर, शारदा पिळणकर, मीनल मर्गज, विद्या कोरगावकर, मनीषा मिठबावकर, गीता डावरे, स्मिता भोसले, अलका गाड, शिवानी विचारे, संध्या नारकर, चैताली मोर्ये, श्रावणी कोकरे, सुनीता पाटील, मंजिरी वारे, सुचिता गावडे, अक्षता मेस्त्री, आरती मेस्त्री, सुहासिनी कुलकर्णी, स्नेहलता सावंत, अविता डावरे, ज्योती मुणगेकर, नीलम सावंत, नंदा गावडे, स्वाती सुतार, प्राची पारकर यांच्यासह कणकवली शहर व शहरालगतच्या गावांतील अनेक महिलांनी सहभाग घेतला.
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘श्रावणसरी’ कार्यक्रमाला पारंपरिक संस्कृती, आनंद आणि महिला एकजुटीची सुंदर किनार लाभली. फुगड्या, खेळ आणि उखाण्यांच्या माध्यमातून महिलांनी मनमुराद आनंद लुटत कार्यक्रमाची रंगत वाढवली.