कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक तोंडावर शिंदे सेनेच्या सविता परमेकर यांचा भाजपात प्रवेश

शेअर करा

दोडामार्ग, दि. २७ सप्टेंबर

कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत निवडणूका या वर्षे अखेरीस होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोडामार्ग शहरात हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात शिवसेना भाजपा युती आहे. असे असताना रविवारी
दोडामार्ग शहरातील शिंदे शिवसेना महिला पदाधिकारी सविता संतोष परमेकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षा श्वेता कोरगांवकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांची दोडामार्ग महिला शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

दोडामार्ग तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश पार पडला तसेच दोडामार्ग शहरातील मोहीनी रेडकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

सविता परमेकर तसेच मोहिनी मोहन रेडकर यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश दोघांचाही शहरा बरोबरच ग्रामीण भागात चांगला संपर्क या वेळी भारतीय जनता पार्टी च्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता ताई कोरगावकर, पंचायत समिती सभापती पार्वती गवस, भारतीय जनता पार्टी च्या तालुकाध्यक्ष दीपक गवस, महिला तालुकाध्यक्ष दीक्षा महालकर, नगराध्य चेतन चव्हाण, ओ. बी. सी. जिल्हाउपाध्यश आनंद तळणकर,पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, शहराध्यक्ष राजेश फुलारी आकांक्षा शेटकर, नगरसेविका संध्या प्रसादी, संजना म्हावळणकर, गौरी पार्सेकर, नाईक मॅडम, स्वप्नील गवस, समीर रेडकर, सुमित म्हाडगुत, स्वप्नील देसाई उपस्थित होते.

शेअर करा