कुडाळ : तुमचा संघर्ष आणि आनंददायी जगण्याला सलाम !

शेअर करा

अंध बांधवांच्या स्नेहमेळाव्यात युनियन बँक कुडाळ शाखेचे व्यवस्थापक अभिषेक शिरूरकर यांचे गौरवोद्गार

कुडाळ,दि.३० जून

तुम्ही न्याय हक्क आणि मागण्यासाठी जीवनात संघर्ष करीत आहात. अंध आहात याची जाणीव तुम्ही स्वतःला करून देत नाही. संघर्षमय जीवन जगत असताना तुमच्या चेहऱ्यावरील हास्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. तुमचा संघर्ष आणि आनंददायी जगण्याला सलाम आहे, असे गौरवोद्गार युनियन बँक कुडाळ शाखेचे व्यवस्थापक अभिषेक शिरूरकर यांनी कुडाळ येथे अंध बांधवांच्या स्नेहमेळाव्यात केले. अंध बांधवासाठी विविध योजना व उपक्रम राबविणाऱ्या राष्ट्रीय दृष्टीहीन संघ या संस्थेचे त्यांनी कौतुक केले.
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट विभागीय शाखा-कोकण या संस्थेच्यावतीने हेलन केलन यांच्या स्मृतिदिनानिमित कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात अंध बांधवांचा स्नेह मेळावा उत्साहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरूरकर बोलत होते. मनसेचे युवा जिल्हाध्यक्ष केतन सावंत (सावंतवाडी) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर साईकृपा अपंग संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे अध्यक्ष बाबुराब गावडे, महासचिव शेखर आळवे, सहसचिव प्रकाश वाघ व शाम माजगावकर, मनसेचे राज जाधव आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्र‌माला सुरुवात करण्यात आली. संस्थेचे सहसचिव वाघ यांनी संस्थेच्या उपक्रमाची महिती दिली. शिरूरकर यांनी समाजाने प्रेरणा घ्यावी, असे कार्य या संस्थेतर्फे सुरू आहे. अंध बांधवासाठी चांगले काम संस्था करीत असल्याचे सांगून बँक संद‌र्भात काय अडचण आल्यास आपण मदत करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. केतन सावंत म्हणाले, ही संस्था नसून कुटुंब आहे. ती अंध बांधवांसाठी उपक्रम राबवित आहे. तसेच तुम्हाला शासकीय योजनाचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. संस्था अंध बांधवांचा आधार म्हणून काम करीत आहे. तुमच्यातील जिद्द, ताकद फार वेगळी आहे, असे त्यांनी सांगितले. दिव्यांगासाठी आरोग्य शिबीर आयोजित करायचा आपला मानस त्यांनी व्यक्त करून आपण तुमच्या पाठीशी राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिंगाडे म्हणाले, दिव्यांग बांधवांना न्याय मिळावा म्हणून लढा देत असतो. आपण सर्वांनी आपली एकजूट दाखविली पाहिजे. संघर्ष केल्याशिवाय आम्हला आपले हक्क मिळणार नाहीत. आपला फायदा करून घेतला पाहिजे. आपण आपल्या संस्थेच्या कायम पाठिशी राहीन, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिव्यांग बांधवांसाठी भवन उभारणार असल्याचे आश्वासन दिले आहे, असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गावडे यांनी प्रास्ताविकात हेलन केलर यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच आपल्या संस्थेतर्फे कोणते उपक्रम राबविले जातात, याची माहीत देत तुम्ही सस्था सभासद आहात.संस्थेच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले. संस्थेचे महासचिव शेखर आळवे यांनी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ या संस्थेच्या किती शाखा आहेत आणि काय उपक्रम राबविले जातात. या कोकण शाखेतर्फे आम्ही लाभार्थीना रेल्वे पास, बसपास व अन्य शासकीय योजनाचा लाभ देत असतो. समाजातील दानशूर व्यक्तीच्या सहकार्यातून असे कार्यक्रम करीत असतो. आपले अंध बांधव एकत्र येऊन त्यांच्यामध्ये हितगुज व्हावे. त्यांचे मनोबल वाढावे.यासाठीच असे कार्यक्रम राबवित असल्याचे सांगितले. राष्ट्रीय दृष्टीदिन संघ कोकण या संस्थेचे सहसचिव अंध बांधव शाम माजगांवकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत चांगले काम केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कणकवलीचे अमित सावंत व संदीप सावंत यांच्यातर्फे अंधबाध‌वांना ब्लँकेट देण्यात आले होती. त्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते अंध बाधवांना करण्यात आले. मराठा समाज सभागृहाचे व्यवस्थापक महेंद्र गवस, माजी नगराध्यक्ष विनायक राणे तसेच डिसोजा यांचेही सहकार्य लाभले. संतोष दळवी, प्रशांत कदम, समिर नाईक, शेजल आळवे, काशिबाई दळवी, रंजना देसाई,सविता गावडे, साईराज बिर्जे उपस्थित होते. तसेच या मेळाव्याला ९० अंध बांधव लाभार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन वाघ यांनी तर आभार आळवे यांनी मानले.

शेअर करा