कुडाळ : चेंदवण येथील मेस्त्री कुटुंबाला घर बांधणीसाठी भाजपकडून सहाय्य मिळणार

शेअर करा

मुसळधार पावसात घरावर झाड पडून मोठे नुकसान

कुडाळ, दि. ६ जुलै

कुडाळ तालुक्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील योगेश मेस्त्री आणि विजय मेस्त्री यांच्या घरावर झाड पडले. यामुळे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच भाजप पदाधिकार आणि कार्यकर्त्यांनी पाहणी केली. तसेच मेस्त्री कुटुंबाला घर पुन्हा बांधण्याकरिता आवश्यक साहित्य भाजपकडून देण्यात येईल. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, भाजपा मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य मोहन सावंत, भाजपा तालुका उपाध्यक्ष राजा धुरी आदी उपस्थित होते.

शेअर करा