कुडाळ : घोटगे-सोनवडे घाटरस्त्यास केंद्राची परवानगी कुडाळ तालुक्याच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात

शेअर करा

आंब्रड जि. प.सदस्य दीपलक्ष्मी पडते

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे आभार

कुडाळ,दि.२५ ऑगस्ट

मागील अनेक वर्षे प्रलंबित असलेला घोटगे-सोनवडे-कोल्हापूर घाटरस्त्याचा प्रश्न आज मार्गी लागला असून यामुळे घोटगे दशक्रोशीतील नागरिक आनंदित झाले आहेत. आमदार निलेश राणे यांनी आज या संदर्भात केंद्र सरकारकडून परवानगी प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे.
गेली सुमारे ४० वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेला घोडगे सोनवडे कोल्हापूर घाटरस्ता मार्गी लावण्यात खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि गेल्या २ वर्षात सतत पाठपुरावा करणारे आमदार निलेश राणे, मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नांना व घाट रस्ता संघर्ष समितीच्या मागणीला यश मिळाले.
या घाटरस्त्याबाबत खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी पाठपुरावा केल्याने हे यश मिळाल्याचे जिल्हा परिषद आंब्रड मतदारसंघाच्या सदस्या दीपलक्ष्मी पडते यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येथील नागरिकांनी सुद्धा घोटगे-सोनवडे घाटरस्त्याच्या कामी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला त्यांचेही सदस्या दीपलक्ष्मी पडते यांनी आभार मानले आहेत.
सिंधुदुर्गमधून कोल्हापूर जोडणाऱ्या अस्तित्वातील घाटरस्तापैकी सर्वात कमी अंतर ,कमी वळणे, कमी खर्चाचा पूर्ण वर्षभर सुरक्षित असलेला पर्यायी घाटरस्ता म्हणून याला मान्यता मिळाली असून या घाटरस्त्याच्या कामास लवकरात लवकर सुरू होऊन तो पूर्ण होईल. यामुळे पर्यटन, दळवळण याला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेअर करा