जि. प. सदस्य रूपेश पावसकर यांची मागणी
कुडाळ,दि.०८ ऑगस्ट
ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा यांच्या २९ जुलै २०२९ च्या पत्रानुसार, एचपीसीएलच्या घरगुती गॅस जोडणीची अनिवार्य तपासणी करण्यासाठी प्रत्येक ग्राहकाकडून २३८ रुपये शुल्क “कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ” मार्फत वसूल केली जाणार आहे, असे कळविण्यात आले आहे. परंतु, सदर पत्रामुळे गावातील नागरिकांमध्ये मोठा संभ्रम व नाराजी आहे. अचानक २३६ रुपये शुल्क मागितली जात आहे. १० ते १५ वर्ष जुनी कनेक्शन असलेल्या ग्राहकांना पण सक्ती केली जात आहे. सदर शुल्क एचपीसीएलच्या कोणत्या परिपत्रकानुसार आहे, याचा कोणताही पुरावा दिलेला नाही. गॅस कंपनी थेट वसुली न करता खरेदी विक्री संघामार्फत वसुली करत आहे. त्यामुळे ग्राहकांना पर्याय नाही. किमान १५ दिवसाची लेखी नोटीस न देता अचानक वसुली करणे (वरील २३६ /- फी) अनिवार्य आहे का? कोणत्या नियम/जीआरनुसार आहे ? याचा खुलासा सात दिवसात द्यावा. तसेच तपासणी न केल्यास गॅस बंद होईल का हे स्पष्ट करावे. ग्राहकांना इतर अधिकृत मेकॅनिकचा पर्याय आहे का? हे देखील कळवावे. ग्रामपंचायतीने सदर पत्र कोणाच्या आदेशाने व कोणत्या ठरावाने काढले याची चौकशी करावी. जोपर्यंत एचपीसीएलकडून लेखी खुलासा येत नाही, तोपर्यंत कोणतीही सक्तीची वसुली थांबवण्याचे आदेश ग्रामपंचायतीला द्यावेत. सामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंड पडू नये. कृपया तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नेरुर देऊळवाडा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांनी केली आहे