कुडाळ : बंद झालेली कुडाळ-कोरजाई बसफेरी पुन्हा सुरू

शेअर करा

प्रवाशांकडून समाधान व्यक्त;रश्मी नाईक यांचा यशस्वी पाठपुरावा

कुडाळ, दि. ०८ जुलै

कुडाळ आगारातून अनेक वर्ष सुरू असलेली कुडाळ-कोरजाई वस्तीची बसफेरी बंद करण्यात आली. ती पुन्हा सुरू करण्यात यावी असे राष्ट्रीय कर्मचारी सेना यांच्यामार्फत रश्मी देवेंद्र नाईक यांनी कुडाळ आगार व्यवस्थापकांची भेट घेवून निवेदन व चर्चा केली.
सदर भेटी वेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे आगाराचे कार्याध्यक्ष ऍड. राजीव कुडाळकर, उपाध्यक्ष चंद्रकांत वालावालकर, महिला संघटक रेवती राणे, सचिव मिथुन बांबूळकर व कर्मचाऱ्यांचे केंद्रीय नेतृत्व रोशन तेंडोलकर आदी उपस्थित होते.
सकाळी ९ वा. कुडाळ आगारातून सुटणारी कवठी बसफेरी व दुपारी २.१० वा सुटणारी कुडाळ कुशेवाडा मार्गे कोरजाई बसफे-या गेली अनेक वर्षे सुरू होत्या. पण अचानक सदर बसफे-या बंद करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे रश्मी नाईक यांचे नेतृत्वाखाली सदर बससेवा पुन्हा सुरू करण्याबाबत कुडाळ आगारव्यवस्थापकांसोबत यशस्वी चर्चा करण्यात आली.

शेअर करा