कुडाळ, दि.१२ ऑगस्ट
संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन यासाठी अटल प्रतिष्ठान सातत्याने गेली वीस वर्षाहून जास्तकाळ संस्कृत भाषेतील विविध स्पर्धांचे आयोजन करते. संस्कृत दिनाचे औचित्य साधुन रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी दहा वाजता श्री. पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असुन ही स्पर्धा डॉ. अमुल पावसकर व कुडाळ एम्.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशन उपाध्यक्ष आणि उद्योजक डॉ. नितिन पावसकर या दोन्ही बंधूनी त्यांचे वडील स्व. महादेव उर्फ भास्कर नारायण पावसकर यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केलेली आहे.
सदर स्पर्धा ही तीन गटात होणार असुन इयत्ता पाचवी ते सहावी – गणपती स्त्रोत्र पाठांतर स्पर्धा, दुसऱ्या गटात इयत्ता सातवी ते आठवी – गीत गायन स्पर्धा, तर तीसरा गट इयत्ता नववी ते दहावी कथाकथन स्पर्धा. विजेत्या स्पर्धकांना बांबूपासून बनवलेली आकर्षक स्मृतीचिन्हे व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हातील ज्या शाळांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी अटल प्रतिष्ठान कार्यालयीन सहाय्यिका कु. ज्योती राऊळ मोबा. नं. ९४०४७५६८९५ वर संपर्क साधून दि. २५ ऑगस्ट २०२६ पूर्वी नोंदणी करावी असे आवाहन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड नकुल पार्सेकर व कार्यवाह रघुनाथ तानावडे यानी केले आहे.