वीडियो व्हायरल कुडाळच्या मुख्य बाजारपेठेतील घटना
कुडाळ,दि.२२ ऑगस्ट
सिंधुदुर्गच्या कुडाळ शहरातील एका हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये बाहेर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या सामोशांवर ठिकाणी एक कुत्रा मागच्या बाजूने आला आणि त्याने तोंडाने सामोसा बाहेर खेचून काढला. त्यानंतर हा कुत्रा चक्क मनसोक्त सामोसा खात असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेय. विशेष म्हणजे, या घटनेकडे हॉटेल मालकाचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आले. अन्नपदार्थांची विक्री करताना स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले जाते का? संबंधित प्रशासन याची दखल घेणार का? आणि ग्राहकांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोणाची? या प्रकारामुळे हॉटेलमधील अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत आणि ग्राहकांच्या आरोग्याबाबतचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.