गणेशकोंडमधील पाण्यात मगर
कुडाळ,दि.२४ ऑगस्ट
कुडाळ शहराच्या नजीक असलेल्या पिंगुळी भुपकरवाडी येथील गणेशकोंड येथील पाण्यात मगर घुसल्याची घटना आज संध्याकाळी घडली. ही मगर पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनास्थळी वन विभाग कुडाळ, एमआयडीसी अग्निशमन दल, कुडाळ नगरपंचायत अग्निशमन दल, कुडाळ पोलीस मगरीला पाण्यातून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले असून गणेशकोंडमध्ये असलेले पाणी बाहेर काढले जात आहे. ग्रामपंचायत सदस्य पिंगुळी अयाझ, खुल्ली, अजय बांदेकर यांनी गणेशकोंडमधील पाणी काढण्यासाठी मोटरपंप उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे पाणी उपसा करण्यात येत आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ३ च्या सुमारास हो मगर गणेशकोंड परिसरात आली असून ती ४ ते ६ फूट असण्याची शक्यता आहे.