कुडाळ : अखेर पिंगुळी मार्गावरील “ती” धोकादायक झाडे हटविली

शेअर करा

कुडाळ,दि.०६ जुलै

कुडाळ-वेंगुर्ला रोड पिंगुळी पूर्णब्रह्म हॉटेल ते दर्गा या रोडच्या दुतर्फा रस्त्यावर भली मोठी सुरूची झाडे सुकलेली होती. ती धोकादायक बनली होती. दोन दिवसापूर्वी चालत्या एका दुचाकीवर सुकलेल्या झाडाची फांदी पडली आणि त्यात चालकाला दुखापत झाली. त्याला तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यावेळी दीपक गावडे, चेतन राऊळ, दर्शन कुडव, जावेद मुजावर घटनास्थळी उपस्थित होते. तसेच दीपक गावडे व चेतन राऊळ यांनी ही घटना बांधकाम विभाग अभियंता बामणे यांना कॉलवर माहिती देऊन घडलेली घटना सांगितली. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे तोडण्यास सांगितली. त्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी झाडांची पाहणी करून तोडून घेऊयात असे आश्वासन दिले. रविवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्मचारी आणि लागणारे साहित्य त्यांनी पाठवून झाडे आज तोडून घेतली. त्यावेळी तन्मय वालावलकर, चेतन राऊळ, दीपक गावडे, अजय आकेरकर, मंगेश चव्हाण, मंगेश मस्के, अजय बांदेकर, मयूर परब ,दत्तगुरु राऊळ, राकेश गावडे, समीर मयेकर, मंदार साटम, विजय सडवेळकर आदी उपस्थित होते..

शेअर करा