कुडाळ: “फोटिव्ह वन” कंपनीमार्फत घोटगेजि. प. केंद्र शाळा नं. १ ला शैक्षणिक साहित्य वाटप

शेअर करा

सरपंच चैताली ढवळ यांच्या समाजोपयोगी कार्याची ;“फोटिव्ह वन”ने घेतली दखल

कुडाळ,दि.१८ जुलै

कुडाळ तालुक्यातील घोटगे गावात मागील दोन वर्षे तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये सरपंच चैताली चेतन ढवळ यांनी समाजोपयोगी वेगवेगळे हे उपक्रम हाती घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने घोटगे गावातील जे विद्यार्थी बाहेरील शाळेत शिकत होते आणि ते विद्यार्थी घोटगे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतील अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी आपल्या सरपंच मानधनातून भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या विशेष निर्णयाचे संपूर्ण राज्यात कौतुक झाले. तसेच अन्य गावातही अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले. याची दखल घेऊन “प्लूक टेक्नॉलॉजी” (फोर्टिव्ह वन) या कंपनीने गावचे सुपुत्र मोहन कोरगावकर यांच्यामार्फत संपर्क केला असता आपल्या सीएसआर निधीतून शाळा व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य १ लाख २८ हजार रु. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, स्पर्धा पुस्तके, पेन, पेन्सिल ,खोडरबर, शार्पनर, रंग साहित्य, कंपास बॉक्स, पाण्याच्या बाटल्या, रेनकोट/छत्री तसेच शाळेसाठी आवश्यक असलेले गॅस शेगडी, सिलींग फॅन, टेबल फॉन लोखंडी कपाट, प्रोजेक्टर, खेळाचे साहित्य स्मार्ट टीव्ही, भोजनासाठी आसन पट्ट्या, तोटी असलेली स्टील टाकी, टेबल क्लॉथ एवढे साहित्य उपलब्ध करुन दिलेले आहे. सदर साहित्य मिळणेसाठी सदर कंपनी सोबत मोहन कोरगावकर, चेतन ढवळ आणि सरपंच चैताली ढवळ यांनी प्रयत्न केले. विद्यार्थी वर्गाला आणि शाळेला साहित्य सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आज जि. प. केंद्र शाळा घोटगे नं. १ येथे पार पडला. यावेळी
कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, “फोटिव्ह वन” कंपनीचे सदस्य मोहन कोरगांवकर, घोटगे सरपंच चैताली ढवळ, उपसरपंच रमाकांत कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन तेली, सोसायटी अध्यक्ष गणेश बुटाले, मुख्याध्यापक थापडे, शिक्षक मयुर थोटे, काजरेकर, जांभवडेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चेतन ढवळ, माजी सरपंच तुकाराम शिंदे, रविकांत तावडे, सूर्यकांत कोरगांवकर, प्रवीण नाईक, सचिन ढवळ, साक्षी ढवळ, शिक्षक तांबे, ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा