जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांचा आरोपी
कुडाळ,दि.०८ ऑगस्ट
राज्यात सर्वच ठिकाणी एसआरआय SRI सर्वेचे काम जोमाने सुरु आहे. परंतु, कर्मचारी सरळपणे सांगतात की “कलेक्टर मॅडमची ऑर्डर आहे. SRI पूर्ण होईपर्यंत आम्ही इतर कोणतीही कामे करू शकत नाही.” सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात ठिकठिकाणी स्ट्रीटलाईट बंद अवस्थेत आहेत. रात्री गावात अंधार, महिलांची गैरसोय. चोरीची भीती अशा गंभीर समस्या आहेत. गणेशोत्सव आणि गोपाळकाला पुढच्या महिन्यात आहेत. गावात घाण साचत आहे. जन्म-मृत्यू दाखले, पाणीपुरवठा तक्रारीकडे दुर्लक्ष होत आहे. SRI हे महत्वाचे आहे. पण त्याचबरोबर ग्रामपंचायतीची नियमित कामे पण तेवढीच महत्वाची आहेत.आपणास नम्र विनंती की आपण आपल्या स्तरावरून जिल्हा परिषद सीइओ व सर्व बीडीओ यांना आदेशित करावे की, SRI + नियमित कामे अशी रोस्टर पद्धत लागू करावी. (उदा. सकाळी ग्रामपंचायत कामे, दुपारी SRI) स्ट्रीटलाईट, पाणी, स्वच्छता ही कामे अत्यावश्यक असल्याने त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ द्यावे कोणत्याही कर्मचाऱ्याने “आम्ही काहीच करणार नाही” असे सरळ नकार देता कामा नये याबाबत लेखी सूचना द्यावी. गणेशोत्सव तोंडावर आहे. तरी कृपया तातडीने कार्यवाही करून सर्व ग्रामपंचायतींना आपले स्तरावरून सूचना द्याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नेरूर देऊळवाडा रुपेश अ. पावसकर यांनी केली आहे