कुडाळ : घोटगे गावातील व्यायामशाळेचे काम योग्य पद्धतीने!

शेअर करा

उपसरपंच रमाकांत कोरगावकर यांचा घोटगेवासियांना विश्वास

विद्यमान सरपंच चैताली ढवळ या लोकाभिमुख कार्य : ग्रामस्थ त्यांच्या सदैव पाठीशी राहणार

कुडाळ,दि.१४ जुलै
कुडाळ तालुक्यातील घोटगे ग्रामपंचायत येथे व्यायामशाळेचे काम चुकीच्या ठिकाणी होत आहे, अशी माहिती प्रसारित होत असून ही सर्व चुकीची आहे, असे आरोप उपसरपंच रमाकांत शांताराम कोरगावकर यांनी केला आहे. अशामुळे
ग्रामपंचायत घोटगे गावचे नाव खराब करु नये, असे आवाहन कोरगावकर यांनी केले आहे.


घोटगे ग्रामपंचायत ही ७ गुंठे क्षेत्रामध्ये इमारत असून त्यातील २ गुंठे क्षेत्र हे व्यायामशाळेसाठी दिली आहे. मागील एक वर्ष गावामध्ये सरपंच व सर्व सदस्य या इमारतीसाठी जागा देण्यासाठी इच्छुक होते. मात्र, यासाठी सदर कामासाठी कोणीही जागा देण्यास तयार नव्हते. तसेच गावामध्ये आरोग्य उपकेंद्र व तलाठी ऑफिस या इमारती मंजूर आहेत. तरी सदर सदस्यांनी या इमारतीसाठी विनामोबदला जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच विद्यमान सदस्यांना गेल्या मासिक सभेमध्ये विद्यमान सरपंच यांनी सदर इमारतीस तुमचा विरोध असल्यास अन्य ठिकाणी तुम्ही जागा उपलब्ध करून द्या, त्या ठिकाणी आपण काम करु असे सरपंच चैताली चेतन ढवळ यांनी सांगितले होते. परंतु, याबाबत कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे विद्यमान सदस्यांनी कुठेतरी आपल्या गावची प्रतिमा खराब होईल असे करत आहेत. घोटगे सरपंच यांनी आताच्या युवा पिढीसाठी व्यायामाची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे व्यायामशाळा होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्राधान्य घेतले आहे. मागील ४ वर्षे विद्यमान सरपंच चैताली ढवळ या लोकाभिमुख कार्य करीत आहेत. त्यांच्या आजवरच्या कार्यकाळात घोटगे गावात अनेक प्रकारचे लोकोपयोगी कामे तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आलेत. सरपंच यांनी स्वखर्चातून अनेक उपक्रम राबविले आहेत. तसेच विविध योजनामधून मागील ४ वर्षात गावामध्ये विविध विकासकामे केल्यामुळे सदस्यांना ही बाब खटकत असल्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुक डोळ्यासमोर ठेवून नाहक बदनामी करत आहेत, असा आरोप रमाकांत कोरगावकर यांनी केला आहे.


गावात व्यायामशाळेचे काम प्रस्तावित केलेल्या नियोजित ठिकाणीच होत आहे. तसेच विद्यमान सदस्यांनी आधी चौकशी करावी की नियोजित जागा कुठे होती ? त्यानंतर बोलावे,असा इशारा कोरगावकर यांनी दिला आहे. तसेच मंजुरी प्रस्ताव बघून विनाकारण बदनामी करु नये. नागरिकांची दिशाभूल करू नये, घोटगे गावातील सर्व नागरिक सरपंच चैताली ढवळ यांच्या कामकाजावर समाधानी आहोत. त्यांच्या पाठीशी सदैव राहू, असे प्रतिपादन उपसरपंच रमाकांत कोरगावकर यांनी केले आहे.

शेअर करा