घोटगे सरपंच चैताली चेतन ढवळ यांचा कौतुकास्पद निर्णय
कुडाळ,दि.१५ जून
घोटगे गावातील मुलांना जि. प. शाळेत प्रवेश दिल्यास शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ वर्षासाठी ग्रामपंचायत घोटगेची आर्थिक वर्ष २०२६-२७ ची घरपट्टी स्वतः सरपंच मानधन आणि स्वखर्चातून भरणा करणार आहेत.
घोटगे गावातील मुलांना जि. प. शाळेत घातल्यास शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ या वर्षातील घरपट्टी सरपंच चैताली चेतन ढवळ यांनी माफ केली होती. तसेच गेल्या वर्षीच्या पटसंख्येमध्ये यावर्षीच्या निर्णयामुळे शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ या वर्षात घोटगे गावातील लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे १० विद्यार्थ्यांची जि. प. केंद्रशाळा घोटगेमध्ये वाढ झाली असून आता पटसंख्या ३० झाली आहे.
‘नवागतांचे स्वागत’ या कार्यक्रमामध्ये गावातील जे विद्यार्थी अजूनही बाहेरगावी व शहराच्या ठिकाणी शिकत आहेत त्यांनी जर घोटगे गावातील जि. प. शाळेत महिनाभरात दाखल केले तर स्वतः सरपंच चैताली चेतन ढवळ यांनी आर्थिक वर्ष सन २०२६-२७ या वर्षातील घरपट्टी स्वतः सरपंच मानधनातून व स्वखर्चातून माफ करण्याबाबत निर्णय घेतला आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित सरपंच चैताली चेतन ढवळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चेतन ढवळ, उपाध्यक्ष साक्षी हर्षद ढवळ, ग्रा. पं. सदस्य सचिन तेली, ग्रामपंचायत अधिकारी गणेश भोगले, माजी सरपंच दीपक मोर्ये, शाळेचे मुख्याध्यापक थापडे, शिक्षिका जांभवडेकर, शिक्षक धोटे, चंदन ढवळ, हर्षद ढवळ, पल्लवी ढवळ, स्नेहा घोटगेकर, प्रतिभा गुरव, मेघना ढवळ इत्यादी व इतर कर्मचारी वर्ग, पालकवर्ग व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.