कुडाळ : बांद्यात गोवा बनावटीच्या दारूसह ९.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

शेअर करा

बेकायदा दारू वाहतुकीविरोधात पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाया

कुडाळ,दि.०३ जुलै

बांदा चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाया सुरू आहेत. पोलिसांनी आज संध्याकाळी गोवा बनावटीच्या दारूसह एकूण ९ लाख ४७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बोलेरो पिकअप’ (क्र. MH 07 AJ 5209) गाडीची पोलिसांनी थांबवून तिची झडती घेतली.
​या तपासणीदरम्यान गाडीमध्ये पोलिसांना गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूचे बॉक्स आढळून आले. या दारूची एकूण किंमत ४ लाख ४७ हजार २४० रुपये इतकी आहे.
​या प्रकरणी पोलिसांनी अमोल लक्ष्मण चिंदरकर (वय ३५, रा. कलमठ, ता. कणकवली) याला ताब्यात घेतले आहे.

शेअर करा