आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई
कुडाळ युवासेना उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ यांनी मानले आभार
कुडाळ,दि.२६ जून
आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई जाहीर झाल्याबद्दल कुडाळ युवासेना उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ व सर्व यु्वासेना पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त करत राज्य सरकारचे तसेच आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांचे आभार मानले आहेत.