भाजपा ओबीसी मोर्चातर्फे आ. प्रमोद जठार यांचा सन्मान
कुडाळ,दि.१९ सप्टेंबर
कुडाळ तालुक्यातील कुसबे येथे भाजपा ओबीसी मोर्चा, ओरोस मंडल यांच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दीपप्रज्वलन करून विविध उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.
दीपप्रज्वलन करताना देशसेवेचा हा दीप सदैव तेवत राहावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश अधिकाधिक उजळत राहावे आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावे, अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पासह मोदी यांच्या नेतृत्वाला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष भाई सावंत, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश (छोटू) पारकर, पंचायत समिती सदस्य नितीन महाडेश्वर, आबा मुंज यांच्यासह कुसबे गावातील ग्रामस्थ आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.