कुडाळ एसटी बसस्थानक आवारात डास प्रतिबंधक फवारणी

शेअर करा

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार

कुडाळ,दि.१८ जुलै

पावसाळी हंगामात आजारांचे प्रमाण वाढत असते. यामध्ये डेंग्यू, कॉलरा, हिवताप यासारखे आजार डोके वर काढतात. हे आजार प्रामुख्याने डासांमुळे होत असतात. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपत कुडाळ एसटी बसस्थानक येथे स्वखर्चाने डास (मच्छर) प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक मंदार शिरसाट, संदीप महाडेश्वर, संदेश पडते, संतोष शिरसाट, मंदार चंद्रकांत शिरसाट, रूपेश तुळसकर, निनाद हिर्लेकर, भूषण कुडाळकर उपस्थित होते.
या एसटी स्टँड येथे ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करीत असतात. स्थानक आवार, स्वच्छतागृह येथे प्रामुख्याने ही फवारणी करण्यात आली. यामुळे साथीच्या आजारांना प्रतिबंध होईल. नगरसेवक मंदार शिरसाट यांनी कुडाळ शहरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले असून त्यातील रोगप्रतिबंधक फवारणी कार्यक्रम राबविण्यात आला. नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.
नगरसेवक मंदार शिरसाट आणि कुडाळ शहर शिवसेना माध्यमातून टप्याटप्याने कुडाळ शहरात वृक्षारोपण व मच्छर प्रतिबंधक फवारणी करण्यात येणार आहे.

शेअर करा