Kudal News:कुडाळमध्ये डंपरची बोलेरो पिकअपला धडक; दोघे किरकोळ जखमी

शेअर करा

मुंबई-गोवा महामार्गावरील आरएसएन हॉटेलसमोर अपघात; डंपरचालक संतोष पवार याच्याविरोधात कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल

कुडाळ,दि.२३ ऑक्टोंबर
कुडाळ शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर आरएसएन हॉटेलसमोर डंपरने बोलेरो पिकअपला धडक दिल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या अपघातात बोलेरो पिकअपचे नुकसान झाले असून, दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी बोलेरो चालक इरफान सतार वाडा (वय ३०, रा. ओखा, जि. देवभूमी द्वारका, गुजरात) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार डंपरचालक संतोष विठ्ठल पवार (४१ अन्सूरपाल वेंगुर्ला) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इरफान वाडा हे बोलेरो पिकअप घेऊन गुजरात ते केरळ असा प्रवास करत होते. २३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे २.१५ वाजता ते कुडाळ शहरातील आरएसएन हॉटेलसमोर आले असता, मुंबई-गोवा महामार्गावरून वाळू घेऊन जाणाऱ्या डंपरचालकाने अचानक उजव्या बाजूने हयगयीने वाहन वळवून बोलेरो पिकअपला धडक दिली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या धडकेत बोलेरो पिकअपचे नुकसान झाले, तसेच चालक इरफान व त्यांच्यासोबत असलेल्या क्लिनर महमद रेहमतुल्ला यांना किरकोळ दुखापत झाली. डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे नमूद करत इरफान यांनी कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. याबाबत कुडाळ पोलीस स्थानकचे हे. कॉ. सचिन गवस तपास करीत आहेत.

शेअर करा