कुडाळ,दि.२३ जून
महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कुडाळ हायस्कूलच्या होतकरू व गरजू मुला-मुलींना वह्या तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम शिवसेना कुडाळ शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश केळबाईकर, शैलेश घाडी आणि आबा कुडाळकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाची खरी पावती ठरला.