कुडाळ : रोटरी क्लब कुडाळकडून नेशन बिल्डर पुरस्कार वितरण

शेअर करा

अंगणवाडी ते महाविद्यालयी १० आदर्श व्यक्तिमत्वाचा केला सन्मान

शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञानाचा आणि संस्कारांचा सन्मान : काशिनाथ सामंत सर

कुडाळ,दि.०८ सप्टेंबर
रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून शिक्षक दिनाच्या औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांपासून ते महाविद्यालयीन कार्यरत असलेल्या १० गुणवंत शिक्षकांचा “द नेशन बिल्डर अवॉर्ड” देऊन गौरव करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे संपन्न झाला. यावेळी शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञानाचा आणि संस्कारांचा सन्मान काशिनाथ सामंत सरांनी गौरोद्गार काढले.
यावेळी कुडाळ हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ सामंत सर, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता सुरवसे, कुडाळ रोटरी क्लब अध्यक्ष मकरंद नाईक, सचिव राकेश म्हाडदळकर,इव्हेंट चेअरमन सचिन मदने, माजी असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर, रविंद्र परब, डॉ. संजय केसरे आदी उपस्थित होते.

रोटरी नेशन बिल्डर पुरस्काराचे मानकरी :
नयना सावंत (अंगणवाडी सेविका घावनळे खुटवळवाडी), रुपाली चव्हाण अंगणवाडी सेविका (मुळदे), लक्ष्मण आगलावे प्राथमिक शिक्षक( कुडाळ पडतेवाडी शाळा), अमोल गोसावी (प्राथमिक शिक्षक नेरूर गोवेरी), रुपेश कर्पे सहाय्यक शिक्षक (पणदूर हायस्कूल), विद्यानंद पिळणकर (सहाय्यक शिक्षक साळगाव हायस्कूल), सलोनी सावंत (उच्च माध्यमिक विभाग, पणदूर हायस्कूल), अजित व्हनमाने (उच्च माध्यमिक विभाग), कुडाळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज), देवयानी आंगचेकर (सहाय्यक प्राध्यापक, संत राऊळ महाराज महाविद्यालय), एस. के. पवार सहाय्यक प्राध्यापक (संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ) या आदर्श व्यक्तिमत्वाला सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देवून गौरविण्यात आले.

यावेळी रोटरी अध्यक्ष मकरंद नाईक म्हणाले की, शिक्षक फक्त शिकवत नाहीत, ते पिढ्या घडवतात; स्वप्नांना दिशा देतात आणि राष्ट्राच्या भविष्याची पायाभरणी करतात. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इव्हेंट अध्यक्ष सचिन मदने यांनी केले तर आभार सचिव राकेश म्हाडदळकर यांनी व्यक्त केले.

शेअर करा