कुडाळ: रोटरी क्लब कुडाळकडून किनळोसच्या शेतकऱ्यांना नारळ-सुपारी रोपांचे वाटप

शेअर करा

कुडाळ,दि.१४ जुलै

किनळोस गावामध्ये रोटरी क्लब कुडाळ यांच्यावतीने मोफत फळझाडे वितरण समारंभ किनळोस गावचे पोलीस पाटील राजेश जानकर यांच्या घरी आयोजित करण्यात आला. यावेळी शेतक-यांना १२५ नारळ व १२५ सुपारीची रोपे वाटप करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मकरंद नाईक, सचिव राकेश माडगळकर, खजिनदार डॉ. जयश्री केसरे, माजी अध्यक्ष प्रमोद भोगटे, गजानन कांदळगावकर, आनंद वेंगुर्लेकर, भगीरथ प्रतिष्ठान नवीन मालवणकर, हिर्लोक किनळोस ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच नरेंद्र राणे, किनळोस गावचे पोलीस पाटील राजेश जानकर, गावातील ग्रामस्थ आदी उपसिथित होते.

विविध योजनांची माहिती
भगीरथ प्रतिष्ठान संस्थेचे पदाधिकारी नवीन मालवणकर यांनी शेतकऱ्यांसाठी बायोगॅस सुविधा, कोंबडी गुड, सोलर कंपाऊंड आदी सर्व योजनेची माहिती दिली.
सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपली नावे पोलीस पाटील यांच्याकडे द्यावीत असे आवाहन करण्यात आले.

शेअर करा