कुडाळ नगरपंचायत प्रशासनाविरोधात सत्ताधारी नगरसेवकांमध्ये आंदोलनाची चढाओढ नेमकी का सुरू आहे?
शिवसेना प्रवक्ते बाळा पावसकर यांचा सवाल
कुडाळ,दि.१० जुलै
नगरपंचायत निवडणुकीत अवघ्या सहा-सात महिन्यांवर येऊन ठेपल्याने सत्ताधारी नगरसेवकांमध्ये आपल्या अपयशाचे खापर प्रशासनाच्या माथी मारण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. कधी शिंदे गटाचे नगरसेवक नगरपंचायत प्रशासनाविरोधात उपोषण आंदोलनाची नोटीस देतात तर कधी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नगरपंचायत प्रशासना विरोधात उपोषणास बसतात. प्रत्यक्षात दोन्ही पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असताना सत्ताधारी नगरसेवकांना आंदोलन करावे लागते म्हणजेच प्रसासनावर कोणत्याही प्रकारचा स्थानिक आमदारांचा अंकुश राहिलेला दिसून येत नाही. कुडाळ नगरपंचायतीमध्ये गेल्या अडीच वर्षांमध्ये कोणताही विकास न करू शकल्यामुळे शहरातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी सत्ताधारी नगरसेवक नगरपंचायत प्रशासन विरोधात आंदोलनाची भूमिका घेत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते बाळा पावसकर यांनी केला आहे.