कुडाळ : कुडाळमध्ये शिंदे सेनेला दणका…

शेअर करा

बाळा पावसकर स्वगृही परतले ; माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेत प्रवेश

कुडाळ,दि.२५ जून

कुडाळ तालुक्यातील शिंदे शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण उर्फ बाळा पावसकर यांनी आज ठाकरे सेनेत प्रवेश केला. बाळा पावसकर यांनी दोन वर्षांपूर्वी ठाकरे सेवेतून शिंदे सेनेत प्रवेश केला होता. मात्र, आज त्यांनी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या मुख्य उपस्थितीत ठाकरे सेनेत प्रवेश केला. बाळा पावसकर यांची ठाकरे सेनेच्या कुडाळ तालुका प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शेअर करा