कुडाळ : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिन कुडाळ शाखेत साजरा

शेअर करा

कुडाळ, दि. १९ जून

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनानिमित्त आज कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ शाखा येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.
यावेळी उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहर प्रमुख संतोष शिरसाट, उपशहर प्रमुख शैलेश काळप, गुरू गडकर, युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, युवासेना शहर समन्वयक अमित राणे, विभाग प्रमुख दीपक आंगणे, उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर,अँड. शिवप्रसाद सामंत, रामचंद्र कोकरे , नागेश जळवी, बाळा पावसकर आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

शेअर करा