विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग; शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना
कुडाळ,दि.०५ सप्टेंबर
वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरीमध्ये ४ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या सहभागामध्ये विद्यार्थ्यांची दिलेली प्रतिक्रिया
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा म्हणणं खूप सोपं असतं. पण शिक्षकांचं जगणं समजून घेणं कठीण असतं.. स्वर्गात 40 50 मुलं असतात प्रत्येकाचं भविष्य घडवायचं असतं… कुणी हुशार,कोणी खोडकर, कुणी शांत तर कुणी बिनधास्त असतं, चुकीवर ओरडलं तर शिक्षक कठोर,प्रेमाने समजावलं तर शिक्षक कमजोर.. गुण कमी पडले तर शिकवण कमी, जास्त आले तर श्रेय मात्र मुलांचं पण एक गोष्ट लक्षात ठेवा आई-वडील जन्म देतात पण त्या जन्माला दिशा देणारा शिक्षकच असतो. आज फोटो काढून स्टेटस ठेवणारे अनेक असतील पण आयुष्यभर लक्षात ठेवणारे काहीच असतील… कारण शिक्षक फक्त धडा शिकवत नाही तो माणूस घडवतो आणि माणूस घडविणाऱ्याची किंमत मार्कशीट वर कधीच लिहिता येत नाही ज्या शिक्षकांनी आपल्याला तू हे करू शकतोस असे सांगितले त्यांना फक्त आज नाही… आयुष्य सलाम असायला हवा. शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

