कुडाळ : अदानीच्या प्रीपेड स्मार्ट मीटरला ठाकरे शिवसेनेचा विरोध; महावितरणला निवेदन

शेअर करा

कुडाळमध्ये महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन प्रीपेड मीटर बसविण्याची प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणी; पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आंदोलनात्मक पाऊल

कुडाळ, दि. १९ जून

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणकडून अदानी कंपनीचे प्रीपेड मीटर जोडणी सुरू असून याला ठाकरे शिवसेनेने विरोध केला आहे. या प्रकरणी आज कुडाळ तालुका ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कुडाळ येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन याचे निवेदन दिले. जिल्ह्यात अदानी कंपनीचे प्रीपेड मीटर जोडण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी हे मीटर जोडण्यात आले आहेत. या प्रीपेड मीटरमुळे विजेचे बिल मोठ्या प्रमाणात येत असल्याने हे मीटर काढून पुन्हा जुनेच मीटर जोडावेत. तसेच नवीन प्रीपेड मीटर जोडणी करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, उपशहर प्रमुख शैलेश काळप, गुरू गडकर, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, युवासेना शहर समन्वयक अमित राणे, विभाग प्रमुख दिपक आंगणे, उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, प्रसाद गावडे, दीपक गावडे, रामचंद्र कोकरे, किरण कोचरेकर, संजय बोभाटे आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेअर करा