कुडाळ : हुमरमळा-वालावल ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडून कौतुक

शेअर करा

प्रत्यक्ष पाहणीनंतर व्यक्त केले समाधान; सदिच्छा भेटीत ग्रामपंचायतीच्या कार्याची प्रशंसा

कुडाळ,दि.०९ जुलै

हुमरमळा -वालावल ग्रामपंचायतीच्या कामांचे कौतुक ऐकून होतो. परंतु, प्रत्यक्षात आज या ग्रामपंचायतीचे कामकाज पाहिले आणि समाधान वाटले असे गौरवोद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी काढले.
प्रमोद कामत आणि दादा साईल यांनी हुमरमळा ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे आणि सरपंच अमृत देसाई यांनी जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांचे गुलाब रोपे देऊन सन्मानित करण्यात आले.

ग्रामपंचायतीचे कामकाज समाधानकारक :
हुमरमळा-वालावल ग्रामपंचायतीच्या कामांचे कौतुक ऐकून होतो. परंतु, प्रत्यक्षात ग्रामपंचायतीला भेट देण्याचा योग आला. ग्रामपंचायत इमारत आणि विकासकामांचा आढावा घेता या ग्रामपंचायतीचे काम समाधानकारक आहे असे गौरवोद्गार अध्यक्ष कामत यांनी काढले.

शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना प्राधान्य द्या : दादा साईल
या ग्रामपंचायतीचे काम समाधानकारक असून शेतक-यांसाठी जिल्हा परिषदेकडे योजना आहेत. त्यासाठी शेतक-यांना योजनांचा फायदा मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दादा साईल यांनी ग्रामसेविका अपर्णा पाटील यांना दिल्या. यावेळी ग्रामसेविका अपर्णा पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांचे विशेष आभार मानले.

शेअर करा