मालवण: आमदार निलेश राणे यांच्या हस्ते १०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण

शेअर करा

मालवण,दि.२३ ऑगस्ट

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल तसेच डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथील १०० गरजू विद्यार्थ्यांना आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मोफत सायकलींचे वितरण करण्यात आले. शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर अशोक पाटकर यांच्या सौजन्याने हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.

नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या सामाजिक दातृत्वासह नवी मुंबई शिवसेना उपशहरप्रमुख महेश (बाबा) परब व नरेश गोविंद परब यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचेही या उपक्रमास सहकार्य लाभले.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी किशोर पाटकर यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून किशोर पाटकर हे विविध ठिकाणी निःस्वार्थ भावनेने सामाजिक सेवा कार्य करत असून, गरजू विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून देण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्था सचिव सुनील नाईक, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची समयोचित भाषणे झाली

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर, मालवण सभापती प्रज्ञा चव्हाण, संस्था सचिव सुनील नाईक, उपाध्यक्ष तथा कट्टा-गुरामवाडचे सरपंच शेखर पेणकर, खजिनदार शाम पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक महेश भाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपा सावंत, विश्वास गावकर, अरविंद करलकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम साळस्कर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण, विभागप्रमुख राजन माणगावकर, समाजकल्याण माजी सभापती बाळ महाभोज, उपसरपंच आबा कामतेकर, कृषी समिती अध्यक्ष प्रताप चव्हाण, आंबेरी सरपंच मनमोहन डीचोलकर, शेखर फोंडेकर, दया देसाई, समीर रावले, देवेंद्र नाईक, नाना गिरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पेंडूरकर व वीणा मयेकर यांनी केले.

शेअर करा